Mon. Apr 19th, 2021

बुलढाण्यात सापडले चक्क 20 नंबरचे बूट, बुटांचं गूढ वाढलं!

सर्वसाधारणपणे बूट 10 नंबरपर्यंतचे असतात. क्वचित 11 किंवा 12 नंबरचे बूट असतात. पण बुलढाणा जिल्ह्यातल्या एका गावात चक्क 20 नंबरचे म्हणजेच दीड फूट लांबीचे बूट सापडले आहेत. हे बूट कोणाचे असतील याबाबत गूढ निर्माण झालं आहे.

सर्वसाधारणपणे बूट 10 नंबरपर्यंतचे असतात. क्वचित 11 किंवा 12 नंबरचे बूट असतात. पण बुलढाणा जिल्ह्यातल्या एका गावात चक्क 20 नंबरचे म्हणजेच दीड फूट लांबीचे बूट सापडले आहेत. हे बूट कोणाचे असतील याबाबत गूढ निर्माण झालं आहे.

 

दीड फुट! कुणाचे बूट?

दुकानात चपला किंवा बूट खरेदीला आपण जातो, तेव्हा फार तर 5 ते 9 नंबरचे बूट किंवा चप्पल उपलब्ध असतात.

फारच मोठे पाय असतील तर 10 किंवा 11 नंबरची चप्पल किंवा बूट लागतो.

पण 20 नंबरच्या बुटांची तर आपण कल्पनाही केली नसेल.

पण एवढे मोठा नंबरचे बूट बुलढाणा जिल्ह्यातल्या बोथा काजी गावात सापडले आहेत.

सुरेश गावंडे यांच्या शेतातल्या विहिरीत हे दीड फूट लांबीचे बूट सापडले आहेत.

विहीरीच्या गाळासोबत दीड फूट लांबीच्या बुटांची जोडी विहिरीबाहेर आली.

एवढे मोठे बूट पाहून सगळेच आश्चर्यचकीत झाले.

या दीड फुटाच्या बुटासमोर सामान्य माणसाचा बूट अगदीच छोटा दिसतो.

या बुटाबाबत बुलढाण्यातल्या विक्रेत्यांना विचारणा केली असता त्यांनी गेल्या चाळीस वर्षात एवढ्या मोठ्या मापाचे बुट विकले नसल्याचं सांगितलं.

दीड फूट लांबीचे बूट कुणाचे असतील?

हे बूट कोण वापरत असावं?

असे बूट वापरणारा माणूस किती उंचीचा असावा?

असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाले आहेत.

दीड फुटाचा बूट एका विहिरीत कचरा साफ करताना सापडल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *