Sat. Apr 17th, 2021

#KargilWar: कारगिल विजयाला 20 वर्ष पुर्ण

20 वर्षांपूर्वी कारगिलच्या पर्वतांवर भारत आणि पाकिस्तानदरम्यान युद्ध झालं. पाकिस्तानी सैनिकांनी कारगिलच्या डोंगरांवर घुसखोरी करत मोर्चेबांधणी केली आणि युद्धाला सुरुवात झाली.

20 वर्षांपूर्वी कारगिलच्या पर्वतांवर भारत आणि पाकिस्तानदरम्यान युद्ध झालं. पाकिस्तानी सैनिकांनी कारगिलच्या डोंगरांवर घुसखोरी करत मोर्चेबांधणी केली आणि युद्धाला सुरुवात झाली. कारगिल युद्धाला आता 20 वर्ष पूर्ण होत आहेत. आजचा हा दिवस शहिद सैनिकांच्या स्मरनार्थ ‘कारगिल विजय दिवस’ म्हणून स्मरला जातो. 100 किलोमीटच्या परिसरात हे युद्ध झालं असून 1700 पाकिस्तानी सैनिकांनी भारतीय सीमारेषेच्या 8 ते 9 किलोमीटर आतमध्ये घुसखोरी केली होती. या संपूर्ण ऑपरेशनमध्ये 527 भारतीय सैनिक मारले गेले आणि 1363 जवान जखमी झाले. मे ते जुलै 1999 दरम्यान हे युद्ध चाललं.

कारगिलला 20 वर्षे!

कारगील जम्मू आणि काश्मीरची राजधानी श्रीनगर पासून २०५ किलोमीटर अंतरावरचं एक लहान शहर आहे.

हे शहर पाकव्याप्त काश्मीरच्या नियंत्रण रेषेपासून जवळ आहे.

1999 साली पाकिस्तानी घुसखोर भारताची नियंत्रण रेषा ओलांडून कारगिलमध्ये शिरले आहे.

2 मे रोजी पाकिस्तानी घुसखोरांची माहिती भारतीय लष्कराला मिळाली.

ताशी नामग्याल या मेंढपाळानं पाकिस्तानच्या घुसखोरीचा माहिती भारतीय लष्करावा दिली.

4 जुलै 1999 रोजी टायगर हिल काबीज, टायगर हिलवर तिरंगा फडकवला.

12 जुलै 1999 रोजी पाकिस्तानचं शांततेच आवाहन केलं.

26 जुलै 1999 रोजी भारताचं ‘ऑपरेशन विजय’ यशस्वी झालं.

कारगिल युद्धात पाकिस्तानचे 600 हून अधिक सैनिक मारले गेले

कारगिल युद्धात पाकिस्तानचे 1500 अधिक सैनिक जखमी झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *