Sat. Apr 17th, 2021

गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर गुळाचे सौदे!

गुढीपाडव्याच्या मुर्हुतावर शाहू मार्केट यार्डात गूळ बाजारात झालेल्या मुहुर्ताच्या सौद्यात 3200 ते 5100 असा प्रती क्विंटल भाव मिळाला. यंदाच्या गूळ हंगामात जवळपास 25 लाख गूळ रव्यांचे सौदे झाले आहेत.

नव्याने गुळ या बाजारपेठेत येत आहेत.

अशात लहान गुळाला सर्वाधिक मागणी असल्याने एक किलो – दोन किलोचे गूळ रवे बाजारात येत आहेत.

तसंच परंपरागत दहा किलो ते तीस किलोपर्यंतचे गूळ रवे बाजारात येतात.

या गुळाला गुजरातमधून सर्वाधिक मागणी आहे.

गेल्या काही वर्षांत अपुऱ्या मनुष्यबळामुळे गुऱ्हाळं बंद होत आहेत.

यात गेल्या दहा वर्षात गुळाचे भावही कमी आले.

त्यामुळे अनेक गुऱ्हाळं बंद झाली.

मात्र गेल्या दोन वर्षापासून गुळाला चांगला भाव मिळत असल्याने गुळाच्या आवकेत वाढ होतानाही पाहायला मिळत आहे.

गुढीपाडव्याच्या परंपरेनुसार बाजार समितीमध्ये आज पाडवा मुर्हुतावर गूळ सौदे झाले.

यात 3 हजार 200 ते 5 हजार 100 असा भाव मिळाला.

हा भाव हंगामाच्या अखेरपर्यंत टिकून रहाण्यासाठी चांगल्या प्रतीचा गूळ बाजारात येणं महत्वाचं आहे. आजच्या सौद्यात गुळाला चांगला भाव मिळाला असल्याच्या प्रतिक्रिया गूळ उत्पादकांनी व्यक्त केल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *