Thu. Feb 25th, 2021

भीषण! पुण्यात विष देऊन 21 मुक्या प्राण्यांची हत्या…

पुण्यात विष देऊन मुक्या प्राण्यांची क्रूरपणे हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. तब्बल 21 पाळीव प्राण्यांची हत्या करण्यात आली आहे. ही घटना पुण्यातील येरवडा परिसरातील एका सोसायटीमध्ये घडली आहे. मांजर आणि कुत्र्यांच्या पिल्लांचीही हत्या करण्यात आली आहे.

“ड्युटीवर असताना मी कोणालाही बघितले नाही. सकाळी मला सोसायटी जवळ मृतदेह आढळला. मी त्याची माहिती सोसायटीतील रहिवाशांना दिली”, असे वॉचमॅन भुषणदास गोखले यांनी सांगितले.

काय आहे नेमके प्रकरण ?

येरवाडातील प्राईडल सोसायटीमध्ये ही घटना घडली आहे.

जेवणातून विष देऊन मुक्या जनावरांची हत्या करण्यात आली.

मागील महिन्याभरात 21 प्राण्यांची हत्या करण्यात आली आहे.

प्रकरणानंतर परिसरातील नागरीकांनी चिंता व्यक्त केली.

प्राणीप्रेमींनी याची दखल घेत स्थानिक पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे.

अज्ञात इसमाविरोधात गुन्हा नोंदवल्याचे सांगण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालमध्ये देखील 13 कुत्र्याच्या पिल्लांची हत्या केली होती.

मुक्या प्राण्यांवर अत्याचार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

पोलिसांनी दिली माहिती

21 प्राण्यांपैकी 14 कुत्री आणि 7 मांजरी हत्या.

मृतांमध्ये कुत्र्याची 6 पिल्लेही होती.

पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *