Thu. Apr 22nd, 2021

IPL : जेव्हा ‘कॅप्टन कूल’ चा सुटला संयम

टीम इंडियाचं कर्णधारपद भूषवलेला महेंद्र सिंग धोनी हा कॅप्टन कूल म्हणून खरंतर ओळखला जातो. मात्र IPL च्या राजस्थान रॉयल्यविरुद्ध झालेल्या सामन्यात मात्र धोनीचा संयम सुटला आणि त्याने डगाऊटमधून मैदानात येत umpires शी वाद घातला. पंचांशी वाद घातल्यामुळे आता धोनीवर कारवाई करण्यात आली आहे.

काय घडलं मैदानात?

IPL च्या राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज सामन्यात शेवटच्या over मध्ये चेन्नईला 18 runs हव्या होत्या.

बेन स्टोक्सने टाकलेला ball फुलटॉस असल्याच्या कारणावरून अम्पायर उल्हास गंधे यांनी No-Ball चा इशारा दिला.

मात्र दुसरे पंच ब्रुस ऑक्सनफर्ड यांनी हा नो-बॉल नसल्याचं म्हटलं.

त्यानंतर उल्हास गंधे यांनी आपला नो-बॉलचा निर्णय मागे घेतला.

मैदानात घडणारा हा प्रकार पाहून Captain Cool धोनीचा संयम सुटला.

तो डगआऊटमधून मैदानात आला आणि पंचांशी भांडला.

Umpires नी धोनीची समजूत काढत त्याला पुन्हा मैदानाबाहेर पाठवलं.

चेन्नई सुपरकिंग्जचाच या सामन्यात विजय झाला.

मात्र धोनीला आपल्या गैरवर्तनाची शिक्षा भोगावी लागणार आहे.

 

धोनीवर कारवाई

जयपूरमध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात IPL च्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी महेंद्रसिंग धोनीच्या सामन्यातील मानधनाच्या 50% रक्कम कापण्यात येणार आहे.

आपल्याकडून चूक झाल्याचं खुद्द माहीनेदेखील मान्य केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *