Fri. Jan 21st, 2022

भाजपला धक्का; ओमी कलानी गटातील २२ नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

  आगामी निवडणुकीच्या तोंडावर उल्हासनगर पालिकेमधील २२ नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रसमध्ये प्रवेश केला आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत उल्हासनगरमधील २२ नगरसेवकांनी ऱाष्ट्रवादीमध्ये प्रवशे केला आहे. त्यामुळे उल्हासनगरमध्ये घडाळ्याची टिकटिक आता वाढली आहे. तसेच १० नगरसेवक आमच्या संपर्कात असल्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले आहे.

  उल्हासनगर महापालिकेत भाजप पक्षाचे एकूण ४० नगरसेवक आहेत. त्यापैकी ओमी कलानी गटातील नगरसेवकांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. याआधी कलानी यांची सून पंचम कलानी यांनी भाजपा नगरसेविका पदाचा राजिनामा दिला आणि पंचम कलानी यांना उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्षा पदाची जबाबदारी दिली. राष्ट्रवादी नेत्यांच्या भेटीनंतर ओमी कलानी गटाचे २२ नगरसेवकांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. तसेच १० नगरसेवक आमच्या संपर्कात असल्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले आहे.

 उल्हासनगरमधील भाजप नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यामुळे राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या नगरसेवकांवर कोणतीही अपात्रेची कारवाई होणार नसून भाजपला या नगरसेवकांना व्हिपदेखील जारी करता येणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *