Sun. Feb 28th, 2021

पेरुच्या वाळवंटामध्ये सापडली २२०० वर्षांपूर्वीची १२१ फुटांची ‘मांजर’

पेरुच्या वाळवंटात २२०० वर्षांपूर्वीची मांजरीचं चित्र कोरलेलं सापडली…

पेरु या देशातील नाज्का वाळवंटाला रहस्यमय वाळवंट असंही म्हटलं जातं. या वाळवंटातमध्ये असलेल्या एका  टेकडीच्या कातळावर मांजरीचं चित्र कोरलेलं आहे. या मांजरीच्या चित्राबद्दलची उत्सुकता आता जगात वाढली आहे.  हे चित्र २२०० वर्ष पूर्वीचे असण्याची शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे. यापूर्वीही असे  अनेक चित्र जगाच्या वेगवेगळ्या भागात आढळून आली आहे.
ही चित्रं म्हणजे नाज्का संस्कृतीची निशाणी असल्याचं मानले जाते. आतापर्यंत ३०० हून अधिक कातळशिल्प पेरुमध्ये आढळून आली आहेत.

जॉनी इस्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे चित्र २२०० वर्षांपूर्वी असेल याचा त्यांनी अंदाज वर्तवला आहे. कातळशिल्पांमध्ये प्रामुख्याने प्राणी आणि ग्रह ताऱ्यांचा समावेश असल्याचे दिसते.इतके  भव्य चित्र त्याकाळातील लोकांनी कोणत्याही अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर न करता कसे रेखाटले असणार  हे कोणालाही आश्चर्य वाटण्यासारखचं आहे. चित्र त्याकाळातील लोकांनी कोणत्याही अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर न करता कसे रेखाटले असणार  हे कोणालाही आश्चर्य वाटण्यासारखचं आहे.

या मांजरीच्या कातळशिल्पाचा फोटो आम्ही ड्रोनच्या मदतीने काढला, असंही इस्ला  यांनी सांगितलं.
हे चित्र इसवी सनपूर्वी ५०० ते इसवीसन २०० च्या दरम्यानच्या कालावधीमध्ये रेखाटलं असल्याची शक्यता इस्ला यांनी व्यक्त केली. पेरुतील संस्कृतिक मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार  हे चित्र जवळजवळ नष्ट होण्याच्या मार्गावर होते. अनेक आठवड्यानंतर या टेकडीवर साफसफाईचे काम करण्यात आलं तेव्हा हे चित्र आता स्पष्टपणे दिसत असल्याचे पेरुतील संस्कृतील मंत्रलायच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. हे चित्र १२ ते १५ इंच जाड रेषांनी तयार करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *