Sat. May 15th, 2021

भारतात येणार आखाती देशातून २६ हजार भारतीय

जगभरात कोरोनावायरसचा कहर सुरूच

जगभरात कोरोनावायरसचा कहर सुरूच आहे. जागतिक पातळीवर अनेक उपाय योजनाचा विचार करण्यात येत आहे. देशात कोरोनाग्रस्त लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रूग्ण सापडले आहे. यादरम्यान, आखाती देशातून २६ हजार भारतीय नागरिक भारतात दाखल होणार आहे.

आखाती देशातून आलेले भारतीय नागरिक मुंबईत दाखल होणार असल्याची माहित मिळाली आहे. संयुक्त अरब अमिराती, कुवेत आणि ओमानसारख्या देशातून अनेक भारतीय नागरिक मायदेशी परत येत असल्याचं मुंबई महानगपालिकेनं सांगितलं. मुंबई महानगपालिकेच्या माहितीनुसार या देशांमधून दररोज २३ विमानं भारतात येत असतात.

या देशातून आलेल्या प्रवाशांना १४ दिवसांसाठी क्वारंटाईनमध्ये ठेवणं अनिवार्य आहे. दुबईवरून महाराष्ट्रात आलेल्या १५ जणांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. यामुळे प्रशासन अनेक ठोस असे पाऊल उचलत आहे.

पवईमध्ये इंजिनिअर्ससाठी उभारलेल्या एका ट्रेनिंग सेंटरला क्वारंटाईन सेंटरमध्ये बदलण्याचा निर्णय घेतला तर सेव्हेन हिल्स रूग्णालयातही आयसोलेशन वॉर्डची व्यवस्था करण्यात आली आहे. यांची माहिती मुंबई महानगपालिकेनं दिली.

आखाती देशातून आलेल्या नागरिक ३१ मार्चला मायदेशी पोहचणार त्यानंतर या नागरिकांचे लोकांचं वर्गीकरण करण्यात येणार आहे. ज्याची प्रकृती उत्तम आणि ज्यांचे घर मुंबईत आहे त्यांना घरी सोडण्यात येणार आहे. ज्यांचे घर दूर आहे त्यांना सेव्हन हिल्स रूग्णालयातील क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *