Sun. Jan 16th, 2022

पुण्यात लस घेऊनही २६ हजार नागरिकांना कोरोनाची लागण

  भारताने १०० कोटी लसीकरणाचा टप्पा ओलांडला आहे. तर पुण्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असल्यामुळे निर्बंध शिथिल करण्यात आले. मात्र लसीकरण होऊनही २६  हजार १४८ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये लसीकरणाचे दोन्ही डोस घेऊनही कोरोना होण्याऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे लसीकरण पूर्ण झाले असले तरी नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

 पुण्यात १ कोटी १७ लाख ५८ हजार नागरिकांचे लसीकरण झाले आहे. लसीकरण झाल्यामुळे पुणेकर बेफिकीर झाले होते. सरकारने आखलेल्या नियमांचे पालन न करणे, मास्क न वापरणे, सामाजिक अंतराची अट मान्य न करणे हे सर्व पुणेकरांना चांगलेच महागात पडले आहे. कोरोना लस घेऊनही पुण्यात २६  हजार १४८ कोरोना रुग्ण आढळले आहेत.

कोरोना लस घेऊनही कोरोनाची लागण

कोरोनाचा पहिला डोस घेऊनही ०.१९ टक्के नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे तर दोन्ही डोस घेऊन कोरोनाबाधितांचे प्रमाण ०.२६ टक्के इतके आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या अधिक आहे.

पुणे मनपा भागात ४९ लाख ३७ हजार ७४ नागरिकांचे लसीकरण झाले असून ११ हजार ८८६ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये २ लाख १८ हजार ७०३ नागरिकांनी कोरोना लस घेतली असून त्यापैकी ८ हजार १३५ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. पुणे ग्रामीण भागात ४६ लाख ३३ हजार ८०९ नागरिकांनी लस घेतली असून ६ हजार १२७ नागरिक कोरोनाबाधित झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *