मालेगावमधील महापौरांसह काँग्रेसच्या २७ नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

मालेगाव महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर महापौरांसह काँग्रेसच्या २७ नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत काँग्रेस नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
मालेगाव हा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. मात्र, याच बालेकिल्ल्यातील काँग्रेस पक्षनेत्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. मालेगाव महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापौर ताहेरा शेख २७ नगरसेवकांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे.
धनंजय मुंडेंना धक्का
राष्ट्रवादीचे नेते आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना केज नगरपंचायतीमध्ये मोठा धक्का बसला आहे. काँग्रेस आणि भाजप पुरस्कृत जनविकास आघाडी एकत्र आली असून सत्ता स्थापन केली आहे. राष्ट्रवादीला दूर ठेवण्यासाठी काँग्रेसचा स्थानिक जनविकास आघाडाल पाठिंबा मिळाल्यामुळे हा राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जात आहे.