Tue. Sep 29th, 2020

Video : सुट्टीदिवशी तिघेही नदीवर पोहायला गेले आणि हे घडलं…

आंबेगाव तालुक्यातील शिंगवे गावात मिना नदीवर पोहायला गेलेली तीन मुले पाण्यात बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

आंबेगाव तालुक्यातील शिंगवे गावात मिना नदीवर पोहायला गेलेली तीन मुले पाण्यात बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.  ही घटना रविवारी संध्याकाळी घडली असून  संपुर्ण रात्रभर या मुलांचा स्थानिक नागरिकांकडून मिना नदीच्या पाण्यात या तिघांचा शोध सुरु आहे. आज सकाळी एनडीआरएफची टिम घटनास्थळी दाखल झाली आणि या टिमकडून या मुलांचा पाण्यात शोध घेतल्यानंतर वैभव चिंतामन वाव्हळ, यश राजेंद्र वाव्हळ,श्रेयश सुधीर वाव्हळ या तीनही मुलांचे मृतदेह मिना नदीच्या पाण्यात सापडले आहेत. काल रविवार आणि घटस्थापनेची सुट्टी असल्याने ही मुले गावातील मीना नदी वरती पोहायला गेली होती त्यावेळी ही दुर्दैवी घटना घडली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *