Mon. Jan 17th, 2022

नाशिकमध्ये दोन दिवसांत महिलांच्या विनयभंगाच्या 3 घटना!

सध्या नाशिक शहरात टवाळखोरांनी चांगलाच हैदोस घातलाय. तब्बल दोन दिवसांत तीन ठिकाणी विनयभंगाच्या घटना समोर आल्यात. त्यामुळे शहरातील महिलांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. यातील एका घटनेत तर अल्पवयीन मुलांचा समावेश असल्याने पोलिसांसमोर देखील आता एक आव्हान उभं राहिलंय.

नाशिक शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या वसंतराव नाईक विद्यालयात विनयभंगाचा प्रकार समोर आलाय.

महिला स्वच्छतागृहात अनिल पवार या सुरक्षा रक्षकाने महिला शिक्षकेचा विनयभंग केला.

याशियाय मोबाइलमध्ये चोरून महिला शिक्षकांचे फोटो काढत असल्याचे पोलिस तपासात समोर आलंय.

गेल्या तीन ते चार दिवसांपासून हा प्रकार सुरू असल्याचे देखील समोर आलंय.

घटना घडताच महिला रडत रडत स्वच्छतागृहाबाहेर पळत आली. शिक्षका रडत असल्याने विद्यार्थ्यांनी विचारपूस केल्याने संतापजनक माहिती उघड झाली.

या घटनेने विद्यालयीन वर्तुळात एकच खळबळ उडालीय.

पीडित शिक्षका घाबरल्याने तक्रार देण्यास नकार दिला. मात्र विद्यालयाचे प्राचार्य यांनी याबाबत तक्रार देत पोलिसांनी गुन्हा नोंद केलाय.

दरम्यान, ही घटना घडण्यापूर्वी गुरुवारी शहरात आणखी दोन घटना घडल्या आहेत.

स्कूलव्हॅन चालकाने विद्यार्थिनीचा चालत्या व्हॅनमध्ये विनयभंग केलाय. त्यावरून पीडित मुलीच्या वडिलांनी तक्रार दिल्याने सरकारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल केलाय. याशिवाय उपनगर पोलिस हद्दीत दोन अल्पवयीन मुलांनी एका अल्पवयीन मुलीच्या डोक्याला बंदूक लावत लग्नाची गळ घातली तिने विरोध केल्याने तिची छेड काढली. यावरून पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय.

शहरातील या घटना जितक्या धक्कादायक आहेत तितक्याच संतापजनक देखील आहेत. अल्पवयीन मुलांचाही विनयभंगासारख्या घटनेत समावेश असल्याने आणि त्यात त्यांच्याकडे बंदूक येत असल्याने मंथन करण्यास भाग पडणारी घटना आहे.

त्यामुळे पालकांनो आपल्या मुलांकडे लक्ष द्या याशिवाय अशा काही घटना समोर येत असतील तर पोलिसांशी तात्काळ संपर्क करा तेव्हाच कुठंतरी अशा घटनांना आळा बसेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *