Wed. Aug 10th, 2022

राज्यात डेल्टा प्लस व्हेरिएंटचेच आणखी ३ उपप्रकार

कोरोनाचा धोका अजून टळलेला नाही . सध्या रुग्णसंख्या थोड्याफार प्रमाणात आटोक्यात आल्याचे चित्र दिसत आहे . त्यामुळे १५ ऑगस्टपासून राज्यातील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. राज्यातील निर्बंध शिथिल केले असतानाच चिंतेची बातमी समोर आली आहे. डेल्टा प्लस व्हेरियंटचे वेगवेगळ्या तीन प्रकारचे विषाणू राज्यात आढळून आले आहेत. डेल्टा प्लस व्हेरियंटच्या या तीन प्रकारामुळे कोरोना महामारीचा धोका आणखी वाढला आहे. तसेच डेल्टा प्लस विषाणूने तज्ज्ञांच्या चिंतेतही भर घातली आहे.

राज्यात डेल्टा प्लस व्हेरियंटच्या ६६ रुग्णांची भर आहे. त्यामध्ये सोमवारी कोल्हापूरच्या सात रुग्णांची भर पडल्याची माहिती समोर आली आहे. विषाणूच्या जिनॉम सिक्वन्सिंगच्या माहितीनुसार, डेल्टा प्लस व्हेरिएंटचे तीन विविध प्रकार आहेत. त्यांना Ay.१, Ay.२ आणि Ay.३ अशी नावं देण्यात आली आहेत. यासोबतच तज्ज्ञांनी डेल्टा प्लसच्या आणखी १३ उपवंशांचा शोध लावला आहे. Ay.१, Ay.२, Ay.३ पासून त्यांची सुरुवात होते आणि हीच यादी १३ पर्यंत जाते.
डेल्टा-व्हेरियंटमध्ये म्युटेशन झाल्यानंतर डेल्टा-प्लस तयार होतो. हे डेल्टाच्या स्पाइक प्रोटीनमध्ये K417N नावाच्या अतिरिक्त म्युटेशनमुळे होते. यामुळे संक्रमित पेशींना विषाणूची जोड वाढते.

राज्यात ६६ डेल्टा प्ससच्या रूग्णांची नोंद असून आतापर्यंत राज्यात कोरोना विषाणूच्या डेल्टा प्लसने संक्रमित झालेले ६६ रुग्ण सापडले आहेत. त्यातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या ६६ रुग्णांपैकी काहींनी लसीचे दोन्ही डोस घेतले होते.

डेल्टा प्लस व्हेरियंटचे सर्वाधिक रुग्ण मुंबईत आहेत. मुंबईत डेल्टा प्लस व्हेरियंटचे ११ रुग्ण आहेत. त्यापैकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. या रुग्णाने दोन लसीचे डोस घेतले होते. या महिलेच्या संपर्कातील सहा जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील दोन जणांना डेल्टा प्लस विषाणूची लागण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.