Sun. Mar 7th, 2021

300 पेक्षा जास्त महिला पोलिसांनी पाहिला ‘मर्दानी 2’

गेल्या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या ‘मर्दानी 2’ या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. सध्या फार कमी सिनेमांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या राणी मुखर्जीने या सिनेमात बहादूर पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. स्त्रियांच्या सुरक्षेसंदर्भात या सिनेमात भाष्य केलं आहे. हैदराबादमधील बलात्कार कांडामुळे स्त्रियांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यादरम्यानच हा सिनेमा प्रदर्शित झाल्याने महिला सुरक्षेचा मुद्दा अधोरेखित झालाय. मर्दानीच्या पहिल्या भागालाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. महिलांच्या ट्रॅफिकिंगवर या सिनेमाचं कथानक बेतलं होतं.

महिला पोलिसांनी पाहिला मर्दानी 2

पिंपरी-चिंचवड मधील 300 पेक्षा जास्त महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी ‘मर्दानी 2’ बघितला.

पोलीस आयुक्तांकडून महिला पोलीस कर्मचाऱ्यांना हा सिनेमा दाखवण्यात आला.

पोलीस खात्यात महिला असो की पुरुष या दोघांनाही दिवस रात्र धावपळ असते.

अशा धावपळीच्या कामकाजातून वेळात वेळ काढून महिला पोलीस कर्मचाऱ्यांना थोडं विरंगुळा म्हणून या सिनेमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

मनोरंजनाच्या बरोबरीनेच हा चित्रपट महिला सुरक्षा आणि महिला पोलीस अधिकारी यांच्यावर भाष्य करत असल्यामुळे हा सिनेमा महिला पोलिसांसाठी विशेष जवळचा होता.

मनोरंजनासोबतच महिला पोलीस कर्मचाऱ्यांचं मनोबल वाढावं, यासाठी पोलिस आयुक्त संदीप विष्णू यांच्याकडून हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.

पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील विविध खात्यात कार्यरत 300 पेक्षा अधिक महिलांनी ‘मर्दानी 2’ पाहिला.

महिलांना फील्डवर नेहमी मर्दानी रूप घ्यावं लागतं. त्यातच कामाचा ताण तणाव कमी व्हावा यासाठी महिलांना ‘मर्दानी 2’ चित्रपट दाखवला. याबद्दल पोलीस आयुक्तांचे महिला कर्मचाऱ्यांनी आभार मानले. सोबतच ‘मर्दानी 2’ बघून आमच्यात पुन्हा एक नवीन जोश निर्माण झाल्याचंही महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *