Mon. Dec 6th, 2021

नोकरी मिळत नसल्यानं तरुणाची आत्महत्त्या

सौरभ कुमार राजपूत या 31 वर्षांच्या तरुणानं दिल्लीतील मयूर विहार उड्डाणपुलावरून उडी घेवून आत्महत्त्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी घडली.

अनेक प्रयत्न करूनही नोकरी मिळत नसल्यानं सौरभने आत्महत्त्या केली अशी माहिती मिळाली आहे.सौरभ मूळचा बिहारमधील बक्सर येथील रहिवासी होता.

सौरभ कुमार याने बक्सर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवी घेतली होती.

तीन महिन्यांपूर्वीच तो नोकरीच्या शोधात नवी दिल्लीत आला होता. त्यानं अनेक कंपन्यांमध्ये नोकरीसाठी अर्ज केले होते.

मात्र, कुठेही नोकरी मिळाली नाही. नोकरीअभावी कुटुंबीयांना आर्थिक आधार देता येत नसल्याने सौरभ निराश होता.

शुक्रवारी संध्याकाळी मयूर विहार उड्डाणपुलावरून उडी घेतली.

त्याला नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतू उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

नोकरी मिळत नसल्यानं सौरभ  कुमार निराश

  • नोकरी मिळत नसल्यानं सौरभ कुमार काही दिवसांपासून तणावात असल्याचे त्याच्या बोलण्यावरून सतत जाणवत होतं, असं सौरभच्या कुटुंबीयांच म्हणणं आहे.
  • सौरभच्या मित्रांकडे चौकशी केली असता तो नोकरीसाठी निराश असल्याचे पोलिसांना समजले.
  • कुटुंबीयांना आधार देवू शकत नाही, याची खंत त्याच्या मनात असल्याचं सौरभने स्वतःच्या डायरीत लिहून ठेवली होती.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *