Fri. May 14th, 2021

छत्रपती संभाजी महाराजांच्या 346 व्या राज्याभिषेकासाठी शिवप्रेमींनी रायगड सजला

स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांचा 346 वा राज्याभिषेक किल्ले रायगडावर उत्साहात साजरा करण्यात आला. बुधवार आणि गुरूवार असे दोन दिवस शिवप्रेमींनी गडावर उत्सव साजरा केला.

गडदेवता शिरकाईदेवी, जगदीश्वर आणि शिवसमाधीच्या पुजनाबरोबर गडावर अभंग, पोवाडे, मर्दानी खेळ खेळण्यात आले.

आज सकाळी शंभुराजांच्या प्रतिमेची मिरवणुक काढण्यात आली.

ढोलताशाच्या गजरात भगवे झेंडे, नंग्या तलवारी नाचवत शिवप्रेमी या मिरवणुकीत सहभागी झाले होते.

शंभुराजांची ही पालखी मिरवणुक राजदरबारात दाखल झाल्यानंतर प्रत्यक्ष राज्याभिषेक सोहळा साजरा झाला.

महाराष्ट्रातील विविध नद्यांच्या पाण्याने शंभुराजांच्या प्रतिमेला अभिषेक घालण्यात आला. अभिषेकाचा हा मान वारकरी सांप्रदायातील दिग्गजांना देण्यात आला.

तुळापुरातही राज्याभिषेक सोहळा जोरदार

पुण्याजवळ तुळापूरला छत्रपती संभाजीराजेंचा राज्याभिषेक सोहळ्याला आज सकाळी सात वाजल्यापासून सुरुवात झाली.

या सोहळ्यासाठी राज्यभरातून तसंच आजूबाजूच्या परीसरातून भगव्या पताका, भगवे फेटे घालून आलेल्या लाखो शिवभक्तांची गर्दी झाली.

समस्त तुळापूर परिसर फक्त ‘छत्रपती संभाजी महाराज’ आणि ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ या जयघोषाने दुमदुमला.

या पालखी सोहळ्यात पोलीस प्रशासनाचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला असून पोलिसांच्या वतीने दांडपट्टा चालवून आपलं कौशल्य सादर केलं.

साडेनऊ वाजता भव्य पालखी सोहळाला सुरुवात झाली असताना अकरा वाजता राज्याभिषेक सोहळाला खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले,आमदार नितेश राणे, सत्यजित तांबे पाटील अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश युवक कँग्रेस, मनोज आखरे प्रदेश अध्यक्ष संभाजी ब्रिगेड ,रविकांत तुपकर नेते स्वाभिमान शेतकरी संघटना यांच्यासह अनेक मान्यवर आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *