Thu. Jul 16th, 2020

नाशिकमध्ये 350 शिवसेना पदाधिकारी आणि 36 नगरसेवकांचे राजीनामे

नाशिक पश्चिममधील शिवसेनेची बंडखोरी रोखून शिवसेनेची मनधरणी करण्यात पालकमंत्री गिरीश महाजन यांना अपयश आले आहे.  नाशिक पश्चिमचा जागा भाजपला सोडल्याने भाजपच्या आमदार सीमा हिरे यांच्या विरोधात शिवसेनेचे गटनेते विलास शिंदे यांनी बंडखोरी केली आहे.

या मतदार संघात भाजपने घुसखोरी केल्याचे सांगत शिंदेच्या समर्थनार्थ शिवसेनचे महानगर प्रमुख, पालिकेतील विरोधी पक्षनेते आणि 35 नगरसेवकांनी आज शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंकडे आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत . त्यामुळे भाजप आमदार सीमा हिरे यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

यापुढे शिवसैनिक म्हणून काम करणार असे म्हणत नाशिक मध्ये भाजप सेना युती तुटल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. भाजपचा नव्हे तर विलास शिंदेचा प्रचार करणार अशी घोषणा करत  जवळपास 350 जणांनी राजीनामे दिले आहेत. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी नाशिकमध्ये येवून  शिवसेनेची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला परंतु यामध्ये त्यांना अपयश आलं आहे.

सोमवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभेवर देखील  शिवसेनेने बहिष्कार टाकला होता. यावरून भाजपाला धक्का बसल्याचे समोर आले होते. सिंधुदुर्गानंतर आता नाशिकमध्येही शिवसेना-भाजप युतीला झटका बसला आहे. अशी चर्चा होत आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *