Fri. Jan 21st, 2022

देशात मंगळवारी ३८ हजार ३५३ कोरोनाबाधित

देशात गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या ४० हजारांच्या जवळपास आढळत आहे. मंगळवारी देशात ३८ हजार ३५३ कोरोनाबाधित आढळले असून ४९७ जणांचा मृत्यू झाला आहे . देशात ३ लाख ८६ हजार ३५१ सक्रिय रुग्ण असून . गेल्या १४० दिवसांतील ही सर्वात कमी सक्रिय रुग्णसंख्या आहे. तर रुग्ण बरे होण्याचा दर ९७.४५ टक्क्यांवर आहे.

मंगळवारी ४० हजार १३ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत .आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या ३ कोटी १२ लाख २० हजार ९८१ झाली आहे. दरम्यान, आठवड्याचा कोरोनाबाधितांचा दर २.३४ टक्के असून दिवसाचा कोरोनाबाधितांचा दर २.१६ टक्के आहे. गेल्या १६ दिवसांपासून कोरोनाबाधितांचा दर ३ टक्क्यांपेक्षा कमी आहे. मंगळवारी ४१ लाख ३८ हजार ६४६ जणांचं लसीकरण झालं असून एकूण ५१ कोटी ९० लाख ८० हजार ५२४ जणांचं लसीकरण पूर्ण झाले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *