Fri. Sep 25th, 2020

नागपूरमध्ये अवैध दारू विक्रेत्यांचा महिला व सरपंचावर हल्ला, 5 जण जखमी

हल्ल्यात 5 जण जखमी, हल्लेखोर अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्याची संतप्त गावकऱ्यांची मध्यरात्रीच मागणी.

नागपूरमध्ये अवैध दारू विक्रेत्यानेच गावातील महिला व सरपंचावर हल्ला केल्याची धक्कादाय घटना घडली आहे.

या हल्ल्यात गावातील 5 जण जखमी झाले असून हल्लेखोर अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी संतप्त गावकऱ्यांकडून केली जात आहे.

नेमकं काय घडलं ?  

शनिवार रात्री 7 वाजताच्या सुमारास सरपंचसह गावातील महिलांनी अवैध दारूविक्री बंदच्या विरोधात सभा आयोजित केली होती

या सभेत दारूबंदीचा ठराव घेण्यात आला, ही सभा रात्री 9 पर्यंत सुरू होती.

त्या पाठोपाठ सभेत उपस्थित ग्रामपंचायत सरपंच सदस्यासह गावातील महिला व नागरिकांनी गावात परिभ्रमण करीत असताना अवैध दारू विक्रेते सुदाम धूर्वे व त्यांचा मुलगा संजय धुर्वे, अरविंद धूर्वे व पांडू हुड यांनी सरपंच शैलेश राऊत व महिलांवर हल्ला केला.

या हल्ल्यात वर्षा गायधने या महिलेचा कान चिरला गेला असून त्या गंभीर जखमी झाल्या आहेत.

यामध्ये वर्षा गायधने, कुंदा पोटभरे, लता बावनकुळे, शालू गायधने, प्रमिला नैताम या महिला गंभीर जखमी झाल्या.

ही घटना शनिवार रात्री 9 ते 10.30 वाजताच्या दरम्यान काचूरवाही येथील बाजार चौकात घडली.

या घटनेनंतर चौकात गावातील नागरिकांचा मोठा जमाव जमला होता.

यानंतर पोलीस गावात उशिरा आल्याने लोकांमध्ये रोष निर्माण झाला होता, यावेळी जमावाने उशिरा आलेल्या पोलीसांना घेरून जोपर्यंत आरोपींना पकडत नाही तोपर्यंत गाडी जाऊ देण्यास विरोध केला.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *