इटलीमध्ये ५९८६ करोना रूग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल!

कोरोनाचा फटका केवळ चीनलाच नव्हे, तर जगाला बसला आहे. चीनपेक्षा जास्त संसर्ग इटलीमध्ये पसरल्याचं दिसून येत आहे. गेल्या २४ तासांत इटलीमध्ये ६२७ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे.
इटलीमध्ये कोरोनामुळे अत्यंत भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. इटलीमध्ये चिंतेचं वातावरण आहे. इटलीमध्ये ५९८६ नव्या लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. परिस्थिती गंभीर झाली आहे. मृतांच्या संख्येत होणारी वाढ काळजीचं कारण बनली आबे. आत्तापर्यंत इटलीत कोरोनाच्या संसर्गामुळे ४०३२ जणांचा मृत्यू झालाय. २६५५ लोकांची प्रकृती चिंताजनक आहे.
उपचारार्थींची संख्याही खूप मोठी आहे. ५१२९ जणांवर उपचार सुरू असून या सगळ्यांवर उपचार यशस्वी झाले आहेत. सर्वाधिक मृत्यू ज्येष्ठ नागरिकांचे झाले आहेत. चीनमधून सुरू झालेलं कोरोनाचं थैमान आता चीनमध्ये कमी झालं आहे. चीनमध्ये रुग्णांची संख्या कमी झाली आहे.