Sun. Mar 7th, 2021

वाघाचा घरात शिरून 6 महिन्याच्या बाळावर हल्ला

चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात गडबोरी येथे वाघाने घरात शिरून 6 महिन्याच्या बाळाला उचलून ठार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना पहाटे तीन वाजता घडली असून बाळ झोपेत असताना त्याला उचलेले असल्याचे त्याच्या कुटुंबियांनी सांगितले आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

नेमकं काय घडलं ?

गडबोरी गावात पहाटे तीनच्या सुमारास वाघाने एका घरात शिरून बाळाला उचल्याची घटना घडली.

बाळ रात्री झोपले असताना वाघ घरी शिरला आणि त्याला उचलून घेऊन गेल्याचे समजते आहे.

चिमुकले बाळ फक्त 6 महिन्यांचे असून वाघाने त्याला ठार मारले आहे.

राकेश गुरनुले असे या बाळाचे नाव आहे.

राकेशचा आवाज येत असल्याने त्याच्या कुटुंबियांना जाग आली.

त्यावेळी राकेश जागेवर नसल्याने तसेच घरात वाघाच्या पायाचे ठसे दिसल्याने राकेशला उचलून घेऊन गेल्याचे कुटुंबियांना समजले.

वाघाने राकेशला घेऊन गेल्याचे समजताच कुटुंबियांनी वनविभाग आणि पोलिसांना त्वीरत माहिती दिली.

वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी शोधमोहिम सुरू केल्यानंतर वाकल रोडवर राकेश मृत अवस्थेत अढळला.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *