‘या’ कारणांमुळे 600 भारतीय विद्यार्थी अमेरिकन पोलिसांच्या ताब्यात

अमेरिकेत जाऊन शिक्षण किंवा नोकरी करणाऱ्या भारतीयांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र अमेरिकेतील पोलिसांनी तब्बल 600 भारतीय विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले आहे. इमिग्रेशनचे नियम मोडल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. US Immigration and Customs Enforcement agency ने केलेल्या चौकशीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
नेमके काय घडले ?
परवानगीशिवाय देशात राहणाऱ्या विविध देशातील विद्यार्थ्यांवर कारवाई केली गेली आहे.
त्यामध्ये 600 भारतीय विद्यार्थ्यांचा समावेश असल्याचं समोर आलं आहे.
कारवाई केलेल्या अमेरिकन संस्थेने आपल्या अधिकृत FB अकाउंटवरुन याबाबतची माहिती दिली आहे.
फ्रेमिंगचन हिल्स भागात बनावट विद्यापीठाची निर्मिती करुन परदेशी विद्यार्थ्यांना लक्ष्य करण्यात आले.
यामध्ये आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली नसलेल्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.
यापुढे नेमके कशापद्धतीने करायचं याकरिता अमेरिकेतील काही भारतीय संघटना आणि ‘तेलुगु असोसिएशन’ हे भारतीय विद्यार्थ्यांना मदत करत आहेत. या सगळ्या आरोपांमधून बाहेर पडण्याचा मार्ग शोधण्याचं काम सुरु आहे. यामधील अनेक तांत्रिक मुद्द्यांमुळे ही गुंतागुंत सोडवण्यात काही कालावधी लागणार असल्याचं सांगितलं जात आहे. परदेशात असलेल्या भारतीय दूतावासामार्फत या विद्यार्थ्यांची लवकरात लवकर सुटका व्हावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत.