Mon. Mar 1st, 2021

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर ६८ वर्षांपूर्वीचं गाणं व्हायरलं

कोरोना व्हायरसचा कहर हा जगात सुरूच आहे. यामुळे जगभरात चिंताजनक वातावरण निर्माण झालं आहे. या व्हायरसपासून बचावण्यासाठी प्रशासनाने शाळा-कॉलेजांना सुट्टी जाहीर केली तर काही कर्मचाऱ्यांना घरी बसून काम करण्यास सांगितले आहे.

कोरोना व्हायरसच्या संदर्भात प्रसार माध्यमाद्वारे जनजागृती होतं आहे.

घराबाहेर पडू नका, खोकताना आणि शिंकतान रुमालाचा वापर करा, साबण आणि हॅडवॉसने हात स्वच्छ धूवा सॅनेटाझरचा वापर करा. अशा अनेक सुचना सोशल मीडियाद्वारे जनतेपर्यत पोहचविल्या जात आहे.

रोजचं कोरोना संदर्भात अनेक बातम्या आणि व्हिडिओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडिओ सध्याच्या घडीला व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ ६८ वर्षांपूर्वीचं असून या गाण्यातील अभिनेत्री मधुबाला आहे.

‘साकी’ या चित्रपटातील गाणं असून या चित्रपटात मधुबाला आणि प्रेमनाथ ही मुख्य भूमिकेत होते. हे गाणं १९५२ साली प्रदर्शित झाले होते. सध्या सोशल मीडियावर या गाण्याची छोटीशी क्लिप व्हायरल होत आहे. या गाण्यात कोरोना व्हायरसपासून कशी काळजी घ्यावी हे मधुबाला यांनी सांगितले आहे. ‘दूर से दूर से जी दूर से हो दूर से… दूर दूर से हां जी दूर दूर से….पास नहीं आइए, हाथ ना लगाइए’ असे या गाण्याचे बोल आहेत.

कोरोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या चेहऱ्याला जर तुम्ही हात लावला तर तुम्हाला करोनाचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे संपर्क टाळा असे गाण्यातून सांगण्यात आले आहे हे गाणे इतक्या वर्षांनंतर सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *