Tue. Mar 9th, 2021

धक्कादायक ! राज्यात कोरोनाचा चौथा बळी

कोरोना विषाणूचा प्रसार वेगाने होत आहे. कोरोना रोखण्यासाठी खबरदारी घेतली जात आहे. मात्र तरीही कोरोना नियंत्रणात येत नाहीये. राज्यात कोरोनामुळे चौथा मृत्यू झाला आहे. त्यामुळे चिंतेत वाढ झाली आहे. मृत झालेल्या कोरोना रुग्णावर मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात केले जात होते.

मृत व्यक्तीचं वय ६५ इतकं होतं. मृत व्यक्तीला २३ मार्चला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या रुग्णाला डायबिटीज आणि हाय ब्लडप्रेशरचा त्रास होता.

मृत व्यक्तीला प्रवासाचा इतिहास होता. ही व्यक्ती १५ मार्चला युएईयेथून प्रवास करुन अहमदाबाद येथे आली. त्यानंतर २३ मार्चला मुंबईत आली होती.

या मृत्यूमुळे राज्यातील मृतांचा आकडा आता ९वर पोहचला आहे. तसेच ताज्या आकडेवारीनुसार आतापर्यंत कोरोनाग्रस्तांचा आकडा हा १०१ इतका आहे.

तसेच सर्व नकारात्मक वातावरण असताना देखील एक सकारात्मक माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रातील एकूण १२ रुग्ण करोनामुक्त झालेत. या रुग्णांचे नव्याने रिपोर्ट काढण्यात आले. हे सर्व रिपोर्ट निगेटीव्ह आले. या १२ रुग्णांना काही दिवस घरी कोरोनटाईन रहावे लागेल.

दरम्यान कोरोनाच्या वाढत्या पादुर्भावामुळे मोदी आज २४ मार्चला जनतेशी संवाद साधणार आहेत. जनतेला मोदी मार्गदर्शन करणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *