Sat. Oct 31st, 2020

मुंबई विमानतळावर नातेवाईकांसमोर तरूणाची आत्महत्या

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून तरुणाने उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अक्षय सारस्वत असे त्याचे नाव असून तो मुळचा उत्तरप्रदेशचा होता. गेल्या काही दिवसांपासून अक्षयची मानसिक स्थिती ठिक नसल्यामुळे आत्महत्या केल्याचे समजते आहे.

नेमकं काय घडलं ?

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या इमारतीवरून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

मानसिक तणावाखाली असल्यामुळे आत्महत्या केल्याचे समजते आहे.

अक्षय सारस्वत असे तरूणाचे नाव असून तो मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी होता.

गेल्या तीन दिवसांपासून अक्षय घर सोडून गेला होता.

अक्षयच्या कुटुंबियांनी त्याचा शोध घेत होते.

शनिवार रोजी अक्षयने आपल्या नातेवाईकांशी संपर्क साधत मुंबईच्या विमानतळावर येण्यास सांगितले.

नातेवाईकांच्या समोरच अक्षयने विमानतळाच्या सहाव्या मजल्यावरून आत्महत्या केल्याचे समजते आहे.

तसेच आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या मृत्यूला कोणीही जबाबदार नसल्याचे अक्षयने चिठ्ठीत म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *