Wed. Jan 19th, 2022

मालेगाव मध्ये झोका खेळणार्‍या मुलाचा गळफास लागून मृत्यू

झोका खेळणार्‍या मुलाचा गळफास लागून मृत्यू झाल्याची घटना दाभाडी गावात सायंकाळी घडली आहे. दाभाडीतील शेतकरी मिलिंद कदम यांचा मोठा मुलगा बारा वर्षीय वेदांत हा घराच्या वरच्या मजल्यावर एकटाच झोका खेळत होता. झोका खेळत असताना त्याच्या गळ्याल झोक्याच्या दोरीचा फास लागला. आणि यात त्याचा जागीच मृत्यु झाला. त्याला तातडीने मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करुन त्यांना मृत घोषित केले.

नेमकं काय घडलं?

दाभाडी येथील शेतकरी मिलिंद कदम यांचा मोठा मुलगा एकटाच झोक्यावर खेळत होता.

बारा वर्षीय वेदांत हा घराच्या वरच्या मजल्यावर असल्याने त्याच्याकडे कोणाचं लक्ष नव्हतं.

खेळता खेळता वेदांतला झोक्याच्या दोरीचा फास लागला. एकटा असल्याने कुणाला कळालं नाहूी.

घरच्यांना कळाल्यानंतर वेदांतला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या दुर्घटनेत त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी तपासणीनंतर सांगितलं.

दाभाडी येथे शोकाकुल वातावरणात त्याच्या अंत्यसंस्कार करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *