भाटिया रुग्णालयाजवळील इमारतीला भीषण आग

मुंबईमधील भाटिया रुग्णालया जवळ असलेल्या इमारतीला भीषण आग लागली आहे. या २० मजली इमारतीच्या १८व्या मजल्यावर सकाळी ८च्या सुमारास भीषण आग लागली असून ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या १२ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
इमारतीला लागलेल्या भीषण आगीत ७ जणांचा मृत्यू झाला असून १५ जण जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना जवळील भाटिया रुग्णालयात उपाचारासाठी दाखल करण्यात आले आहेत.
सकाळी आठच्या सुमारास या इमारतीला भीषण आग लागली. इमारतीला आग लागताच संपूर्ण इमारतीचा विद्युतपुरवठा खंडीत झाला. आग लागल्याची माहिती मिळताच, रहिवासी इमारतीच्या खाली आले. आगीवर नियंत्रण आणण्याचे काम सुरू असून अद्याप काही रहिवासी अडकले असून त्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. मात्र, अद्याप इमारतीला लागलेल्या आगीचे कारण स्पष्ट झालेले नाही.