Wed. Aug 4th, 2021

वैभव राऊतकडे 50 बॉम्ब काय दिवाळीसाठी आणले होते का? जितेंद्र आव्हाड यांचा सवाल

दाभोळकर हत्या प्रकरणाचा गेली 5 वर्ष तपास नीट झाला नसून कर्नाटक पोलिसांनी अमोल काळे यांना अटक केल्यानंतर पोलीस तपासयंत्रणेला वेग आला आहे. “राज्य पोलीस राजकीय दबावखाली काम करीत आहेत. कर्नाटक आणि महाराष्ट्र पोलिसांच्या संयुक्त प्रयत्नांनी सत्य मिळवण्यासाठी एकत्रित येणे आवश्यक आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्र पोलिस यांची एकत्रित समिती स्थापन करून त्यांच्याकडे विचारवंतांच्या हत्येचा तपास सोपवायला हवा. त्यासाठी दोन्ही राज्याची संयुक्त एसआयटी असली पाहिजे “, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली आहे.

जितेंद्र आव्हड काय म्हणाले? – 

 • सीबीआयने कोर्टात सांगितलं गौरी शंकर आणि दाभोलकर हत्येत एकच शस्त्र आहे
 • चार हत्या करणारे पिस्तुल एकच आहे, तर डोकं पण एकच आहे
 • शस्त्रसाठा पुरवणारा कोण आहे, हे महाराष्ट्राला कळलं पाहिजे
 • वीरेंद्र तावडे कोणत्या व्यक्तीशी, संस्थेशी संबंधित आहे हे सगळयांना माहीत आहे
 • गेल्या पाच वर्षात तपस नीट झाला नाही, कर्नाटक पोलिसांनी अमोल काळे अटक केली त्यानंतर गती आली
 • दोन राज्यात ही गॅंग काम करत होती
 • महाराष्ट्र पोलीस यांच्याकडे वैभव राऊत आणि कर्नाटक कडे अमोल काळे आहे
 • सत्य बाहेर काढायचे असेल तर एकत्ररीत्या तपास झाला पाहिजे.
 • दोन्ही राज्याची संयुक्त एसआयटी असली पाहिजे ही आमची मागणी
 • वैभव राऊतच्या घरी 50 बॉम्ब मिळाले ते दिवाळी साठी आणले होते का, की घरातील वरातीसाठी
 • ते देशाविरोधात होते त्याच्याविरोधात देशद्रोह गुन्हा दाखल का झाला नाही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *