Tue. Mar 2nd, 2021

आपल्या पेन्शनच्या पैशातून सरकारला दिली १ लाखांची मदत

कोरोनाच्या संकटाशी लढण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. त्यासाठी अनेक सेलिब्रिटी लॉकडाऊनच्या काळात लोकांना मदत करत आहेत. सरकारच्या सहाय्यता निधीला अनेकजण आर्थिक सहाय्य पुरवलं जात आहे. दक्षिणेतील कलाकारांनी कोट्यवधी रुपयांची मदत लोकांना दिली आहे. तर बॉलिवूडचे कलाकारही आता मदतीसाठी पुढे आले आहेत. याच बरोबरीने सर्वसामान्य लोकदेखील सरकारला मदत करत आहेत. मध्य प्रदेश सरकारला देखील एका वृद्ध महिलेने अशीच केलेली मदत ही एक प्रशंसनीय बाब ठरली आहे.

८२ वर्षीय सेवानिवृत्त कर्मचारी सलभा उसकर यांनी आपल्याला मिळणाऱ्या पेन्शनच्या पैशातून १ लाख रुपयांची मदत मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री सहायता निधीला पुरवली आहे. कोरोनाचं अरिष्ट्य लक्षात घेऊन लोकांनी लॉकडाऊन गांभीर्याने घ्यावं आणि सरकारच्या आदेशांचं पालन करावं असं उसकर यांनी म्हटलं आहे. त्यांचा व्हिडिओ जनसंपर्क विभागाने पोस्ट केला आहे.

मध्य प्रदेशचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहन यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ‘माँ तुझे सलाम’ असं म्हणत हा व्हिडिओ शेअर केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *