Sun. Oct 24th, 2021

घटस्फोटासाठी पत्नीनेच केली पतीची खोटी सही; प्रियकरासोबत केले लग्न

प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असतं याचं उदाहरण मुंब्रा येथे घडले आहे. एका महिलेने आपल्या प्रियकराशी लग्न करण्यासाठी चक्क आपल्या पतीची खोटी सही करत घटस्फोट घेतला. निलोफर या नावाच्या महिलेने दुबईत राहणाऱ्या पतीशी घटस्फोट घेऊन प्रियकरासोबत त्वरीत लग्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

नेमकं प्रकरण काय ?

निलोफर नावाच्या महिलेने आपल्याच नवऱ्याला घटस्फोट देऊन तडकाफडकी प्रियकरासोबत लग्नगाठ बांधली आहे.

हा प्रकार ठाण्यातील मुंब्रा येथे घडला आहे.

विशेष म्हणजे घटस्फोट घेण्यासाठी निलोफरने पतीची खोटी सही केली आहे.

घटस्फोट मिळल्यावर त्वरीत प्रियकरासोबत लग्न केले.

पती दुबईत राहत असल्यामुळे त्याला याची माहिती नव्हती.

मात्र दुबईतून परत आल्यावर आपल्याच पत्नीने आपली फसवणूक केल्याचे समजले.

त्यामुळे पतीने पत्नीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

निलोफरचा पती मस्तान हा दुबईत मेकॅनिकचे काम करतो.

निलोफरला 9 वर्षाचा मुलगा आहे.

पती दुबईला असल्यामुळे निलोफर आपल्या जुन्या प्रियकराच्या संपर्कात आली.

त्यांचे पुन्हा एकदा प्रेमसंबंध जुळले आणि तीने पतीला दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली.

दुबईहून परत आल्यावर त्याच्याशी सतत भांडणे.

तसेच त्याच्याजवळ मोठे घर घेण्याची मागणी केली.

मस्तानने त्याच परिसरात 23 लाखाचे घर घेऊन दिले.

मात्र पुन्हा भारतात आल्यावर त्याला घरी घेत नसल्यामुळे मस्तानने इतरांशी चौकशी केली.

यावेळी मोठे 32 लाखाला निलोफरने विकले असल्याचे समजले.

तसेच निलोफरने आपले घटस्फोट झाला असल्याचे सांगत मस्तानला भेटण्यापासून रोखले.

मात्र ही सही आपण केलीच नसल्याचे समजता मस्तानने पोलीस ठाण्यात धाव घेतली.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *