Mon. Jan 17th, 2022

डिलिव्हरी बॉय हिंदू नसल्यामुळे ग्राहकाने झोमॅटोकडे केली ‘ही’ मागणी

झोमॅटोमधून जेवण ऑर्डर केल्यानंतर डिलिव्हरी बॉय हिंदू नसल्यामुळे डिलिव्हरी बॉय बदलण्याची मागणी एका व्यक्तीने झोमॅटोला केली. मात्र डिलिव्हरी बॉय हिंदू नसल्यामुळे दुसरा डिलिव्हरी बॉय पाठवणार नसल्याचे झोमॅटोने सांगितले आहे. मध्य प्रदेशच्या जबलपूरमध्ये ही घटना घडली आहे.

नेमकं काय घडलं ?

मध्य प्रदेशच्या जबलपूरमध्ये अमित शुक्ला नामक व्यक्तीने झोमॅटोवरून जेवणाची ऑर्डर दिली होती.

मात्र डिलिव्हरी बॉय हिंदू नसल्यामुळे त्याने झोमॅटोला ट्विटरच्या माध्यमातून दुसरा डिलिव्हरी बॉय पाठवण्यास सांगितले.

मात्र आम्ही दुसरा डिलिव्हरी बॉय पाठवणार नसून ऑर्डर केल्याचे पैसे परत करणार नसल्याचे म्हटलं आहे.

झोमॅटोच्या या उत्तरामुळे नेटीझन्सनी भरभरून कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *