Tue. Nov 30th, 2021

नाशिकमध्ये दोन महिलांना घरात घुसून जिवंत जाळले

नाशिक: नाशिकमधील मखमलाबाद रस्त्यावरील शिंदेनगर येथील रिक्षाचालकाने इमारतीतील घर पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये दोन महिला गंभीर भाजल्या असून वयोवृद्ध व्यक्ती आणि दोन मुले बचावली आहेत. मंगळवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.

शिंदेनगर येथील भाविक बिलाजियो या इमारतीमध्ये प्रदीप ओमप्रकाश गौड हे आपले आई, वडील, पत्नी भाऊ, भावजयी, मुले आणि पुतण्यासह राहतात. मंगळवारी सकाळी त्यांच्या घरी मावशी भारती गौड आल्या होत्या. त्यांनतर त्यांच्या परिचयातील रिक्षाचालक सुखदेव कुमावत हा पेट्रोलच्या बाटल्या घेऊन घरात शिरला. त्याने भारती गौड यांना मारहाण करण्यास सुरुवात केली आणि सोबत आणलेल्या बाटल्यांमधील पेट्रोल घरात टाकून आग लावून तो पसार झाला. या घटनेत भारती गौड गंभीररीत्या भाजल्या असून, त्यांची बहीण सुशीला गौडदेखील जखमी झाल्या आहेत.

पंचवटी पोलीस आणि अग्निशमन दलाने वेळीच धाव घेतल्याने अनर्थ टळला आहे. रिक्षाचालक सुखदेव कुमावतला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *