Thu. Oct 1st, 2020

मोबाइल चोराचा पाठलाग करताना लोकल खाली येऊऩ व्यक्तीचा मृ’त्यू

मुंबई येथील चर्नीरोड स्थानकावर मोबाइल चोराचा पाठलाग करताना एका व्यक्तीचा ट्रेन खाली येऊन मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना रविवारी सकाळी चर्नीरोड स्थानकावर घडली आहे. शकील शेख असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

नेमकं काय घडलं ?

रविवारी सकाळी चर्नीरोड स्थानकावर एका चोरट्याने ट्रेनमध्ये चढून मोबाइल चोरल्याची घटना घडली.

या मोबाइल चोराचा पाठलाग करताना एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

शकील शेख यांचा मोबाइल चोरला असून त्यांचा या घटनेत मृत्यू झाला आहे.

शकील शेख हे गोरेगाव येथील रहिवासी असून सकाळी चर्चगेटच्या दिशेने जाणारी लोकल पकडली.

मात्र चर्नीरोड स्टेशनला लोकल पोहोचल्यावर एका चोरट्याने त्यांचा मोबाइल चोरला.

या चोराचा पाठलाग करताना त्यांचा पाय घसरला आणि लोकल खाली येऊन दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समजते आहे.

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *