Fri. Apr 23rd, 2021

विविध कारागृहांतील कैद्यांकडून 27 कोटींची कमाई

गुन्हेगाराला जन्मठेपेसोबत सक्त मजुरी शिक्षा दिली जाते. या कैद्यांकडून  हातमाग, यंत्रमाग, सुतारकाम, चर्मकला, लोहारकाम अशी अनेक काम करुन घेतली जातात. कैद्यांची सुधारणा व पुनर्वसन’  हे ब्रिदवाक्य आणि उद्देश लक्षात घेवून कैद्यांकडून ही काम करून घेतले आहे. कारागृहात अनेक कैद्यांना विशेष कामांमध्ये गुंतवून ठेवले आहे.  2018-19 या आर्थिक वर्षात तेवीस कोटींची कमाई कैद्यांकडून करुन घेण्यात आली आहे.
कैद्यांकडून 27 कोटींची कमाई
राज्याच्या विविध कारागृहांतील कैद्यांनी कोट्यांमध्ये उत्पन्न मिळवले आहे.
हातमाग, यंत्रमाग, सुतारकाम, चर्मकला, लोहारकामातून 2018-19 या आर्थिक वर्षात तेवीस कोटींची कमाई झाली आहे.
तर शेती, मत्स्यव्यवसाय, सेंद्रिय खत निर्मिती यातून चार कोटी अशी 27 कोटींची कमाई कारागृहांना करून दिली आहे,
राज्यात नऊ मध्यवर्ती कारागृहे, नऊ खुली कारागृहे व एक महिला कारागृहात विविध उद्योगांत सुमारे 2200 कैद्यांना गुंतवून ठेवले आहे.
येरवडा, नाशिक, नागपूर कारागृहात हातमाग, यंत्रमाग, सुतारकाम, चर्मकला, लोहारकाम, बेकरी, रसायन उद्योग सुरू आहे.
कारागृहात कैद्यांकडून तयार केल्या जाणाऱ्या फर्निचर, देव्हारे, किचन ट्रॉली, सतरंजी, टॉवेल, बेडशीट आदी वस्तूंना मोठी मागणी आहे.
लाकडी टेबल, खुर्च्या, छपाई, पुस्तक बांधणी आदीला सरकारी कार्यालयांमधून मागणी असते. त्यामुळे वर्षभर कैद्यांना काम असते.
यासाठी कुशल कैद्यांना 61 रुपये, अर्धकुशल कैद्यांना 55 रुपये, तर अकुशल कैद्यांना 44 रुपये रोज दिला जातो.
कारागृहाच्या मालकीची येरवडा, पैठण आदी ठिकाणी शेकडो एकर शेती आहे.
यामध्ये गहू, तांदूळ, ज्वारी, कडधान्ये, सोयाबीन, फळे, ऊस, भाज्या, गायी, म्हशी पालन, मत्स्यशेतीसह सेंद्रिय खत निर्मिती केली जाते.
या कृषी उत्पादनाचा उपयोग कैद्यांच्या जेवणासाठी केला जातो.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *