Jaimaharashtra news

12 वर्ष चेंबूरमध्ये रशियन महिलेवर अत्याचार; पोलीस अधिकाऱ्यानेच केला बलात्कार

चेंबूर येथील पोलीस स्थानकात एका रशियन नागरिकत्व असणाऱ्या महिलेने आपल्यावर 12 वर्ष पोलीस अधिकारी अत्याचार करत असल्याचा धक्कादायक गुन्हा दाखल केला आहे. गेली 12 वर्ष वारंवार अत्याचार करून छळ केला असल्याचे रशियन महिलेने चेंबूर पोलिसांना सांगितले. 2003 साली व्हिजा वाढवून देण्याच्या बाहण्याने पोलीस अधिकाऱ्याने गुंगीचे औषध देऊन वारंवार अत्याचार केल्याचे महिलेने सांगितले. चेंबूर पोलिसांनी या रशियन महिलेची एफआयआर लिहून घेतली असून तपास करत आहेत.

नेमकं प्रकरण काय ?

चेंबूरमध्ये एका रशियन महिलेवर पोलीस अधिकाऱ्याने वारंवार अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे.

या महिलेने स्वत: पोलीस स्थानकात जाऊन पोलीस अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

गेल्या 12 वर्षांपासून महिलेवर पोलीस अधिकारी अत्याचार करत असल्याचे महिलेने सांगितले.

2003 साली व्हिजी वाढवून देण्याच्या बाहण्याने पोलीस अधिकाऱ्याशी आपली ओळख झाली असल्याचे महिलेने सांगितले.

मात्र मदत करण्याच्या बाहणे पोलीस अधिकारी गुंगीचे औषध देऊन अत्याचार करत असल्याचे महिलेने सांगितले.

यामुळे आपला अनेकदा गर्भपातही झाला असल्याचे महिलेने स्पष्ट केले आहे.

महिलेला एक मुलगा असून पोलीस अधिकाऱ्याने मुलासह महिलेलाही मारण्याचा प्रयत्न केला.

त्याचबरोबर याच पोलीस अधिकाऱ्याने एका तरुणीचा आणि तिच्या भावाची हत्या करून पुण्यात एका ठिकाणी गाडले असल्याची माहिती महिलेने पोलिसांनी दिली आहे.

 

 

Exit mobile version