Mon. Oct 25th, 2021

महाराष्ट्राच्या लाडक्या गायिकेचा आज वाढदिवस

झी मराठी वाहिनीवरील ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स ‘ या रियालिटी शोच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटली आलेली आर्या आंबेकर हे नाव कोणत्याही मराठी प्रेक्षकाला नवीन नाही.असा गोड आवाज असलेल्या आर्या आंबेकरचा आज आढदिवस आहे . गोड आवाजाबरोबर आर्याच्या सौंदर्यानेदेखील अनेकांना भूरळ घासलती आहे .

आर्याचा जन्म १६ जून १९९४ मध्ये नागपूरमधील समीर आणि श्रुती आंबेकर या मराठी दांपत्याच्या घरी झाला .आर्याचे वडील समीर आंबेकर हे डॉक्टर असून आई श्रुती आंबेकर गायिका आहे.  आर्याने आपल्या आईकडून गायनाचे धडे घेतले .आर्या साडेपाच वर्षाची असताना तिने आपल्या आईकडे शास्त्रीय गायनाचे धडे गिरवण्यास सुरुवात केले. वयाच्या सहाव्या वर्षी तिने संगीताची पहिली परीक्षा दिली. आर्याची आजीसुद्धा एक शास्त्रीय गायिका आहे . तिने आर्या जेमतेम २ वर्षाची असतानाच तिचे गायनातले कौश्ल्य ओळखले.
झी मराठी २००८ मध्ये रंगलेल्या ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या रियालिटी शोने आर्या आंबेकरला खरी ओळख मिळवून दिली. गायनक्षेत्राप्रमाणेच आर्याने अभिनय क्षेत्रातदेखील तिचं नशीब आजमावलं आहे . उत्तम आवाज आणि अभिनय यांच्या जोमावर आज ती लोकप्रिय अभिनेत्री आहे. तसेच आर्याने आतापर्यंत अनेक मराठी आणि हिंदी भाषा अल्बम्स आणि काही मराठी चित्रपटांसाठी व नाटकांसाठी गाणी गायिली आहेत .२०१७ च्या सुरुवातीस प्रदर्शित झालेल्या ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटातून तिने अभिनय कारकीर्दीस सुरुवात केली . आर्य ला तिचा पुढचा वाटचालीसाठी खूप शुभेच्छा.

तिचा गायिकेपासून ते अभिनेत्रीपर्यंतचा प्रवास आणि तिच्या बद्दलच्या अनोख्या गमती जमती जाणून घेण्यासाठी खालील लिंक पाहा.. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *