पूल कोसळतानाची दृश्यं CCTV कॅमेऱ्यात कैद
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
आसाममध्ये मुसळधार पावसामुळे एक पूल कोसळला. हा पूल कोसळतानाची दृश्यं कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.
हा पूल आधीपासूनच खचला होता. आसाममध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय. त्यामुळे तिथलं जनजीवन पुर्णपणे विस्कळीत झाले.
अनेक शहरांचा राज्यासोबतचा संपर्कसुद्धा तुटला. त्यामुळे नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येतय तसच बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे.
पण, पुल तुटण्याची घटना घडल्यामुळे बचावकार्यातही अडथळा येण्याची शक्यता आहे. आसामच्या नागोआन भागातल्या कालीबोरमध्ये ही घटना घडली. ब्रम्हपुत्रा
नदीवरचा हा पुल होता.