आसाममध्ये पुरात अडकलेल्या बछड्याची सुटका
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
आसाममधल्या नागरबेरा भागात पुरात अडकलेल्या बछड्याची नागरिकांनी सुटका केली.
कामरुप जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पूर आला असून याठिकाणी पुराच्या पाण्यात हा बछडा अडकला होता.
नागरिकांच्या हे लक्षात येताच त्यांनी त्याला ताब्यात घेतले. दरम्यान आसाममध्ये ब्रह्मपुत्रा आणि तिच्या उपनद्यांना आलेल्या पुराचा 24 जिल्ह्यांना तडाखा
बसला.
जवळपास 15 लाख लोकांना या पुराचा फटका बसला असून यामुळे काझीरंगा अभयारण्यातही मोठ्या प्रमाणात पाणी घुसले. यात 53 प्राण्यांचा मृत्यू झाला.