कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांची सीएम टू पीएम आसूड यात्रा
जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर
शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी तसंच न्याय हक्कांसाठी आमदार बच्चू कडू यांनी काढलेली आसूड यात्रा गुजरातमध्ये धडकणार आहे. त्यामुळे ही आसूड यात्रा रोखण्यासाठी गुजरात पोलिसांनी जय्यत तयारी सुरू केली.
नागपुरातून 11 एप्रिलला निघालेली ही आसूड यात्रा 21 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वडनगर गावात धडकणार आहे. सीएम टू पीएम होम आंदोलनाच्या नावाखाली असलेली ही आसूड यात्रा गुजरातमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर आहे.
मात्र, त्यांचे हे सीमोल्लंघन टाळण्याकरता गुजरात पोलिसांनी नवापूर इथे मोठा बंदोबस्त तैनात केले. त्यामुळे गुजरात बॉर्डरवर पोलीस आणि आंदोलकांमध्ये तणावाचं वातावरण आहे.