Mon. Jan 24th, 2022

पती अभिनवचा केला दावा चार वर्षांच्या मुलाला हॉटेलमध्ये सोडून परदेशी गेली श्वेता तिवारी

मुंबई : अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) आणि तिचा पती अभिनव कोहली (Abhinav Kohli) यांच्यामधील घरगुती वाद सुरूच आहे. नुकताच अभिनव कोहली एक इन्टाग्राम अकाऊंटवर व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत अभिनव याने दावा केला की, श्वेताने तिच्या 4 वर्षांच्या मुलाला, रेयांशला मुंबईतील एका हॉटेलच्या खोलीत सोडले आणि ती शुटिंगसाठी केपटाऊनला रवाना झाली. सध्या कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा कहर सुरु आहे. अशा परिस्थिती कोणीही आपल्या मुलाला एका खोलीत सोडून कसे जाऊ शकेल? अभिनवने तीन सलग तीन व्हिडीओ पोस्ट केले आहेत, ज्यात तो असे म्हणतो की, मुलाच्या सुरक्षेसाठी त्याने चाईल्ड हेल्पलाईन क्रमांकावरही संपर्क केला आहे. गेल्या 3 वर्षांपासून अभिनव आणि श्वेता यांच्यात त्यांच्या मुलाच्या कस्टडीवरून वाद सुरू आहेत. अभिनेत्री श्वेता ‘खतरों के खिलाडी’च्या 11व्या सीझनसाठी दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊन शहरात रवाना झाली आहे. अशा परिस्थितीत आता श्वेता तिवारीचा पती अभिनव कोहलीने आपल्या मुलाबद्दल आणि त्यांच्या सुरक्षिततेबद्दल एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. अभिनव म्हणाला की, ‘श्वेता ‘खतरो के खिलाडी’च्या शुटिंगसाठी दक्षिण आफ्रिकेला गेली आहे. जेव्हा तिने मला तिच्या निघण्याविषयी विचारले तेव्हा, कोरोनाच्या परिस्थिती पाहता मी तिला नकार दिला. ती तेथे 12 तास काम करेल. मी म्हणालो की, मुलाला हॉटेलमध्ये सोडण्याची गरज नाही, मी त्याची काळजी घेईन. पण ती आता दक्षिण आफ्रिकेत शूटिंगसाठी गेली आहे, पण माझं मूल कुठे आहे? मी पोलीस स्टेशनला गेलो, पण त्यांनी मला ईमेल करायला सांगितले, बाल कल्याणाकडे जायला सांगितले आहे.” अभिनवने या व्हिडीओमध्ये पुढे सांगितले की, तो आपल्या मुलाचा फोटो घेऊन प्रत्येक हॉटेलमध्ये फिरत आहे. पण मुलगा कुठे आहे, हे माहित नाही. त्याला पोलिसांकडून कोणतीही अपेक्षा उरली नाहीय, असे तो म्हणाला. त्याने चाईल्ड हेल्पलाईन नंबरवर पण कॉल केला. त्यांनी मदतीसाठी विचारणा केली, पण कोणतीही मदत मिळाली नाही. अभिनवने आपल्या मुलासाठी अनेक हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क केला आहे, पण त्याचा काही उपयोग झाला नाही असं अभिनव याने सांगितलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *