Wed. Oct 21st, 2020

ट्रक आणि खासगी बसचा भीषण अपघात, 20 जणांचा होरपळून मृत्यू

उत्तर प्रदेशमधील कन्नौजमध्ये शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. या अपघातात 20 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. आहेत.

ट्रक आणि खासगी बस यांच्यात हा अपघात घडला.

या अपघातानंतर दोन्ही वाहनांनी फेट घेतला.

त्यामुळे लागलेल्या आगीत प्रवासी होरपळून निधन पावले.

ही बस कन्नौजमधील गुरसहायगंज येथून जयपूरला जात होती.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या अपघाताची दखल घेतली असून कन्नौजच्या जिल्हाधिकारी आणि पोलिसांना घटनास्थळी तातडीने जाऊन प्रवाशांना सुरक्षा आणि वैद्यकीय सुविधा पुरवण्याचे निर्देश दिले.

मृतांच्या वारसांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची मदत देण्याचं योगी आदित्यनाथ यांनी जाहीर केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपघाताबद्दल ट्विटरच्या माध्यमातून शोक व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *