Thu. Oct 21st, 2021

मुंबईत चित्रीकरणादरम्यान विचित्र अपघात

मुंबई: मुंबईमधील फिलमसिटीमध्ये चित्रीकरण सुरु असताना विचित्र अपघात झाला. यावेळी स्टंट सीन चांगलाच महागात पडला आहे.

फिल्मसिटीमध्ये जिथे ‘द गर्ल’ चित्रपटाचं चित्रीकरण सुरु असताना स्टंट सिनदरम्यान कार अचानक पलटली. कार पलटणं हे स्क्रीप्टमध्येच होतं. पण, कार जिथं कार पलटणं अपेक्षित होतं, तिथे ती थांबलीच नाही आणि त्यातून विचित्र अपघात घडला.

चित्रीकरण सुरु असताना कार एका जागी पलटून नंतर पुढे जाणं अपेक्षित होतं. मात्र तसं न घडता ही कार कॅमेरा ट्रॉली आणि एका टेम्पोवर जाऊन आदळली. या अपघातात कॅमेरा अटेंडंट जखमी झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *