Wed. Sep 23rd, 2020

लग्नाच्या खरेदीला जाणाऱ्या नेहाची गाडी खड्ड्यात आदळली आणि…

भिवंडी-वाडा महामार्गावर रात्री अकराच्या सुमारास डॉक्टर नेहा शेख हिचा लग्नाच्या खरेदीसाठी जात असताना गाडी खड्ड्यात आदळल्याने मृत्यू झाला आहे.

भिवंडी-वाडा महामार्गावर रात्री अकराच्या सुमारास महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे एका निष्पाप मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नेहमी या रस्त्यावर खड्डयांमुळे अपघात होत असतात. या रस्त्यावर पडणाऱ्या खड्ड्यांमुळे आता पर्यंत अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. सरकार दरबारी दाद मागूनही याकडे दुर्लक्षच होतं आहे.

डॉक्टर नेहा शेख असं या अपघातात मृत्यू झालेल्या मुलीचा नाव असून नेहाचं पुढच्या महिन्यातच लग्न होणार होतं. लग्नाच्या खरेदीसाठी नेहा ठाण्याहून वाड्याकडे जात असताना या अपघातात गाडी खड्ड्यात आदळल्याने तिचा मृत्यू झाला. तिच्यासोबत असलेला भाऊ हा जखमी झाला असून त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे.

गेल्या दोन महिन्यात या महामार्गावर दोघांना आपले जीव गमवावे लागले होते. या रस्त्यामुळे या महामार्गावर प्रवास करणं म्हणजे आपला जीव मुठीत धरून प्रवास करण्यासारखे झाले आहे. या कंपनीच्या जर वेळेतच या रस्त्यावर असणाऱ्या खड्डे जर या कंपनीने भरले असते तर आज या निष्पाप नेहाला आपला जीव गमवावा लागला नसता.

वाडा महामार्गावर असणारा टोल नाका बंद व्हावा यासाठी अनेक आंदोलने करण्यात आली परंतु आंदोलन करूनही व पाठपुरावा करूनही सरकार दरबारी कोणतीही दाद न भेटल्याने  रात्री उशिरा श्रमजीवी संघटनेने या टोलनाक्याला कायदा सुव्यवस्था हातात न  घेता टाळे ठोकले आहे. जोपर्यंत या रस्त्यावर सर्व खड्डे भरले जात नाहीत तोपर्यंत टोल वसुली बंद व्हावे, अशी श्रमजीवी संघटनेचे युवा कार्यकर्ते यांनी मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *