Thu. Nov 21st, 2019

मध्य प्रदेशमध्ये अपघात, 4 हॉकीपटूंचा सामन्यासाठी जाताना मृत्यू

मध्य प्रदेशच्या होशंगादाबादजवळ 4 हॉकीपटूंचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. ते सामन्यासाठी जात असताना कारला अपघात झाला आणि यात या चार खेळाडूंचा मृत्यू झाला आहे. भारताचे राष्ट्रीय आणि जिल्हास्तरीय खेळाडूंचा यामध्ये समावेश आहे.

सामना खेळण्यासाठी निघालेल्या या चार खेळाडूंच्या कारला अपघात झाला. राष्ट्रीय महामार्ग 69 वर ही दुर्दैवी घटना घडली. सामन्यासाठी जात असताना खेळाडूंची कार थेट झाडाला जाऊन धडकली. आणि त्यात चौघांचा मृत्यू झाला या अपघातात तिघे जखमी आहेत. यातील जखमी खेळाडूंना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

होशांगबादमध्ये मेजर ध्यानचंद हॉकी स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत हे खेळाडू स्पर्धक होते. अचानक कारवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला आहे. आशिष लाल (जबलपूर), अनिकेत (ग्वाल्हेर), शहनवाझ खान (इंदोर), आदर्श (इटारसी) यांचा यामध्ये मृत्यू झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *