Mon. Apr 6th, 2020

राज्यात जळीतकांडांचे सत्र सुरूच, महिलेवर अज्ञात युवकाचा अ‍ॅसीड हल्ला

राज्यात जळीतकांडाच्या घटनांचे सत्र सुरूच आहे. काही दिवसांपूर्वीच वर्ध्यातील हिंगणघाट येथील जळीतकांडामुळे संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त होत आहे. त्यानंतर औरंगाबादमधील जळीतकांड उघडकीस आले होते. दरम्यान आता नागपूरमध्ये एका महिलेवर अ‍ॅसीड सदृश्य द्रव्य फेकल्याची घटना घडली आहे.

नेमकं प्रकरण काय ?

नागपूर जिल्ह्यातील सावनेर पोलीस स्टेशन अंतर्गत पहलेपार परिसरात एका महिलेवर एका पुरुषाने अ‍ॅसीड सदृश द्रव्य फेकले.

या आरोपीचे नाव निलेश कान्हेरे असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मात्र हा कोणता द्रव हे अजून स्पष्ट झाले नाही.

संबंधित महिला सरकारी रुग्णालयाची कर्मचारी असून ती त्या परिसरात संबंधित सर्व्हे करायला गेली होती. अचानक 25 वर्षीय तरुणाने समोर येऊन महिलेवर द्रव टाकला. सुदैवाने तो द्रव त्या महिलेच्या चेहऱ्यावर न पडता हातावर पडला.

तसेच घटनेच्या वेळी बाजूला खेळणाऱ्या दोन मुलींवर ही त्या द्रवाचे काही शिंतोडे उडाल्याने त्यांना ही रुग्णालयात आणले आहे. त्या किरकोळ जखमी झाल्या आहेत. तर त्याच वेळी बाजूला उभ्या असलेल्या एका महिलेच्या गळ्यावर त्या द्रवाचे शिंतोडे उडाले. त्यात तिच्या गळ्यावर भाजले आहे.

या प्रकरणात आरोपीने कोणत्या कारणामुळे द्रव्य टाकले याचा तपास लागला नाही. या प्रकरणाचा पोलीस अधिक कसून तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *