डिसले गुरुजींवर कारवाई होणार?

ग्लोबल पुरस्कार विजेते रणजितसिंह डिसले यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अमेरिकेत अध्ययनासाठी जिल्हा परिषदेकडे रजा मागणाऱ्या डिसले गुरजीविरोधात जिल्हा परिषद कारवाई करणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी लोहार यांनी दिली आहे.
जिल्हा परिषदेच्या अर्थातच शासकीय नोकरीवर असलेल्या नागरिकाला अध्ययनासाठी रजा मागताना जिल्हा परिषदेकडे अर्ज करणे बंधन कारक असते. जिल्हा परिषदेत ग्लोबल पुरस्कार विजेते रणजितसिंह डिसले मुख्याधिकाऱ्यांकडे अमेरिकेत पीएचडी करण्यासाठी रजा मागण्यासाठी गेले होते. मात्र, या पीएचडीमधून शाळेला तसेच शिक्षण विभागाला काय फायदा होणार? हे मात्र डिसले गुरुजींनी सांगितले नाही. शिवाय मुख्याधिकाऱ्यांच्यामार्फत अर्ज करण्याऐवजी ते स्वत: रजा मागण्यासाठी गेले.
तसेच रणजितसिंह डिसले यांनी शाळेवर न जाता तीन वर्षांचा पगार घेतल्याची माहिती शिक्षणाधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून डिसले गुरूजी यांच्याकडून तीन वर्षांचा पगार वसूल करण्याचा निर्णय जिल्हा परिषद शिक्षण विभागाने घेतला आहे.
If you could email me with a few hints on just how you made your website look this great, I would be thankful.
brilliant web publication article. I’m going to bookmark and read much more often. I adore the blog template