Mon. Oct 25th, 2021

आमिर आणि किरणचा घटस्फोट, आमिरच्या आयुष्यातील तिसरी व्यक्ती कोण ?

मुंबई : बॉलिवूड मधील लोकप्रिय जोडी अभिनेता आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव या दोघांनी एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे बॉलिवूड विश्वात चर्चेला उधाण आलं आहे. आमिर खान आणि किरण राव यांचा 15 वर्षाचा संसार होता, या 15 वर्षाच्या सुखी संसारात त्या दोघांनी एकमेकांना त्यांच्या चांगल्या वाईट प्रसंगात साथ दिली. तसचं ही जोडी नुसती ग्लॅमरस दुनियेत नव्हे तर सामाजिक कार्यक्रमात नेहमीच अग्रेसर असायची. सत्यमेव जयते, पाणी फाऊंडेशनचे कार्यक्रम या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्राचा दौरा करून ग्रामीण भागाशी नाळ जुळवून घेतली होती. म्हणून ही जोडी बॉलीवुड विश्वातील एक वेगळी जोडी म्हणून नेहमीच चर्चेत असायची. काही वर्षांपूर्वी आमिर खान आणि ‘दंगल’ फेम अभिनेत्री फातिमा शेख या दोघांच्या प्रेमसंबंध असल्याची चर्चा होती. मात्र याबाबत फातिमा शेख हिला विचारणा केली असता ही गोष्ट खोटी असल्याचं म्हणत चर्चाना पुर्णविराम दिला. या आधी २००२ सालामध्ये आमिर आणि अभिनेत्री रीना दत्त विवाहबंधनात अडकले होते. १६ वर्षांनी आमिरने रीनाला घटस्फोट दिला होता. त्यानंतर किरण रावसोबत आमिर खानने दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली. मात्र या दुसऱ्या घटस्फोटानंतर आमिर खानच्या आयुष्यात पुन्हा फातिमा येईल का ? किंवा आमिरच्या आयुष्यात तिसरी नवी स्त्री येईल का ? की आमिर यापुढे एकटं राहणंच पसंत करेल ? अशा अनेक चर्चांना बॉलिवुडमध्ये उधाण आलं आहे.

बॉलिवुड म्हंटल तर तिथे ग्लॅमरस येतोचं आणि या ग्लॅमरस दुनियेत सेलिब्रेटी त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीनंमुळे चर्चेत हा येतचं असतो. त्यामुळे आता आमिर खान आणि किरण राव यांच्या या निर्णयामुळे जसं बॉलिवूड विश्व हदरलं आहे तसेच त्यांच्या चाहत्यांसाठी देखील हा धक्का असणार आहे. दरम्यान आता आमिर यापुढचं आयुष्य एकट्यानेच राहणार की त्याच्या आयुष्यात कोणी तिसरी व्यक्ती येणारं हे पाहणं आता उत्सुक्तेचं ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *