‘ही’ अभिनेत्री साकारणार पंतप्रधान मोदींची ‘रिल लाईफ पत्नी’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर आधारिक बायोपिक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘PM Narendra Modi’असे या बायोपिकचे नाव असून अभिनेता विवेक ओबेरॉय मोदी यांची मुख्य भूमिका साकारणार आहे.
मात्र आता चर्चा सुरु झाली आहे ती म्हणजे मोदी यांच्या पत्नीची मुख्य भुमिका कोण साकारणार आहे.
जसोदाबेन यांची भूमिका कोणती अभिनेत्री साकारणार याची उत्सुकता होती.
आता ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचे नाव अखेर समोर आलं आहे.
जसोदाबेन म्हणजेच नरेंद्र मोदी यांच्या आयुष्याची जोडीदार, जसोदाबेन यांची भूमिका अभिनेत्री बरखा बिष्ट साकारणार आहे.
या सिनेमाचे शूटिंग अहमदाबाद इथे होणार आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या या सिनेमातील जसोदाबेन ही भूमिका आव्हानात्मक असून त्या भूमिकेला विविध पैलू तसेच कंगोरे असल्याचे बरखाने सांगितले आहे.
त्यासाठी मोदींच्या जीवनप्रवासावर आधारित कथांचे तिने वाचन सुरू केले आहे. या भूमिकेसाठी गुजराती लहेजा शिकावा लागणार असल्याचे तिने म्हटले आहे.
या सिनेमाचे शूटिंग अहमदाबादमध्ये होणार असून ते शहर तिच्यासाठी काही नवे नाही.
तिचे पती इंद्रनील सेनगुप्ता हेसुद्धा अहमदाबादचे आहेत. त्यामुळे हे शहर परिचयाचे असून अनेकदा इथे आल्याचे बरखाने सांगितले आहे.
जसोदाबेन यांचे जीवन आणि त्याच्या व्यक्तीमत्त्वाबाबत फारच कमी जणांना माहिती आहे.
त्यामुळे ही आव्हानात्मक भूमिका यशस्वीरित्या साकारु असा विश्वास बरखाला आहे.