Wed. Oct 27th, 2021

‘जब वी मेट’ या चित्रपटासाठी शाहिदच्या पूर्वी अभिनेता बॉबी देओलची निवड

मुंबई- ‘जब वी मेट’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला आणि या चित्रपटाची गणना ही बॉलिवूडमधील उत्कृष्ट चित्रपटात केली जाते. या चित्रपटाने बॉलीवूडला प्रेमकथांकडे बघण्याचा एक नवा दृष्टिकोन दिला. या चित्रपटातील शाहिद कपूर आणि करिना कपूरची जोडी प्रेक्षकांना भयंकर आवडली होती. दिग्दर्शक इम्तियाज अलीचा हा चित्रपट प्रेक्षकांना फार आवडला. मात्र इम्तियाज अली हा चित्रपट शाहिदच्या पूर्वी अभिनेता बॉबी देओल देण्यात आला होता. फार कमी जणांना माहीत आहे की दिग्दर्शक इम्तियाज अली यांनी अचानक बॉबी ऐवजी शाहिदला चित्रपट देऊन देओल कुटुंबाला मोठा धक्का दिला होता.

२००५ साली जेव्हा अभय देओलला चित्रपटसृष्टीत पदार्पण करायचं होतं तेव्हा सनी देओलने दिग्दर्शक इम्तियाज अली संधी दिली होती. चित्रपटाचं नाव होतं ‘सोचा ना था.’ या चित्रपटाच्या वेळेस इम्तियाज आणि देओल कुटुंबात चांगले संबंध होते. काही दिवसानंतर इम्तियाज एका चित्रपटाची कथा घेऊन बॉबी देओलकडे आले. त्यांनी त्या चित्रपटाची कथा बॉबीला ऐकवली आणि म्हटलं हा चित्रपट मला तुझ्यासोबत बनवायचा आहे. बॉबीला देखील कथा आवडली असल्यानं त्याने होकार दिला होता आणि चित्रपटाचं नाव ठेवलं होतं ‘गीत’. काही दिवस झाले मात्र इम्तियाजचा काही निरोप आला नाही त्यानंतर बॉबीला जाणवलं की इम्तियाज आपल्याकडे दुर्लक्ष करत आहे. त्याला वाटलं की ते व्यग्र आहेत म्हणून कदाचित त्यांना वेळ नसेल. मात्र काही दिवसानंतर देओल कुटुंबाच्या कानावर एक बातमी आली की, चित्रपटाचं चित्रीकरण सुरू झालं आहे आणि चित्रपटात बॉबी ऐवजी शाहिद कपूरला घेतलं गेलंय. आणि चित्रपटाचं नाव ठेवण्यात आलं आहे ‘जब वी मेट.’ देओल कुटुंबा ला आश्चर्याचा धक्का बसला. त्यानंतर इम्तियाज आणि देओल कुटुंबात कोणत्याही प्रकारचे संबंध राहिले नाहीत. शिवाय बॉबीला न घेण्याचं कारणही गुप्त राहिलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *