Wed. Aug 10th, 2022

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार काळाच्या पडद्याआड

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन झालं आहे. दिलीप कुमार यांनी सकाळी ७.३० वाजता हिंदूजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या ९८ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली.

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना दिलीपकुमार ऊर्फ मुहम्मद युसुफ खान हे भारतीय चित्रपटसृष्टीतील एक मोठं नाव आहे. त्यांचा जन्म सध्याच्या पाकिस्तानातील लाहोर या ठिकाणी झाला होता. ते हिंदी चित्रपटसृष्टीत ट्रॅजेडी किंग म्हणून ओळखले जात. ‘ज्वारभाटा’ हा १९४४ साली आलेला हा त्यांचा पहिला चित्रपट आहे.

 

 • दिलीप कुमार यांचे खरे नाव युसूफ खान होते. परंतू सिनेमात आपली ओळख निर्माण करण्यासाठी त्यांनी हिंदू नाव दिलीप कुमार ठेवले
 • दिलीप कुमार यांचे प्राथमिक शिक्षण पाकिस्तानातील देओलाली येथील बार्नेस शाळेत झाले.
 • दिलीप कुमार यांचे कुटुंब १९३० साली मुंबई येथे स्थलांतरित झाले. दिलीप कुमार १९४० साली पुणे येथे फळे विकण्याचे काम करत होते.
 • दिलीप कुमार यांनी अभिनय केलेला १९४४ साली ‘ज्वारभाटा’ हा पहिला हिंदी चित्रपट आहे.
 • दिलीप कुमार यांना मुख्यत: ‘ट्रेजेडी’ (शोकांतिका) भूमिका वाट्यास आल्या
 • दिलीप कुमार यांची ‘ट्रेजेडी’ किंग म्हणून बॉलिवूडमध्ये ओळख आहे.
 • १९४७ साली ‘जुगनू’ या चित्रपटात त्यांच्या बरोबर नूरजहाँ, शशिकला या अभिनेत्री होत्या, हा सिनेमा हिट ठरला आणि दिलीप कुमार अभिनेते म्हणून उदयास आले.
 • दिलीप कुमार यांनी चित्रपटसृष्टीला १९४८ साली शहीद, मेला आणि अनोखा प्यार असे सुपरहिट चित्रपट दिले.
 • १९५५ साली दिलीप कुमार यांचा ‘देवदास’ या सिनेमाने भारतीय चित्रपटसृष्टीला एक वेगळा आयाम दिला
 • १९४९ साली दिलाप कुमार यांचा “अंदाज़” या सिनेमात राज कपूर आणि नर्गिस बरोबर त्यांनी काम केले, या चित्रपटाने इतिहास घडवला
 • १९६६ साली दिलीप कुमार यांचे अभिनेत्री सायरा बानो यांच्याशी लग्न झाले.
 • भारत सरकारने त्यांना १९९१ साली पद्मभूषण आणि २०१५ साली पद्मविभूषण या पुरस्काराने सन्मानित केले.
 • १९९४ साली दादासाहेब फाळके पुरस्कारही मिळाला आहे
 • ‘The Substance and Shadow’ हे ‘उदयतारा नायर’ यांनी शब्दबद्ध केलेले दिलीपकुमार यांचे इंग्रजी आत्मचरित्र आहे

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.